नालासोपारा : मुंबईतील नालासोपारा येथील श्रीरामनगर मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सर्व नातेवाईक बहिणीचाच लाड करता म्हणून भावाने तिचा गळा दाबून हत्या केल्याचे घटनेने परिसरात एकाच खडबळ उडाली आहे.
सर्व नातेवाईक मामे बहिणीचेच लाड करतात ही गोष्ट सहन न झाल्यामुळे 13 वर्षीय मुलाने आपल्या 5 वर्षीय मामे बहिणीची हत्या केल्याची घटना नालासोपारा येथील श्रीरामनगर मध्ये घडली आहे. मोहम्मद सलमान खान हे नालासोपाऱ्याच्या श्रीरामनगर येथे राहतात. त्यांची बहीणही त्यांच्याच घरासमोरच राहते. खान यांना दोन मुली आहेत.
हेही वाचा : …पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब
मोहम्मद सलमान खान यांनी शनिवारी दुपारी कामावरून आल्यावर मुलीला शाळेतून आणले. संध्याकाळी ती घराबाहेर खेळात असतांना या अल्पवयीन मुलाने आपल्या मामे बहिणीला गोड बोलून घराजवळून डोंगरावर नेले. तेथे त्याने तिचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून हत्या केली. मुलगी बराच वेळ घरी न आल्याने कुटुंब चिंतेत पडलं. त्यांनी लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसराचा तपास केला असता त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला. मात्र या चिमुकलीची कोणी आणि कशासाठी हत्या केली असेल याबद्दलचा काहीच पुरावा सापडत नव्हता.तेव्हा एका कंपनीच्या सीसीटीव्हीत खान यांचा १३ वर्षांचा भाचा त्याच्या मुलीला घेऊन जाताना दिसला.
पोलिसांनी या अल्पवयीन मुलालाल ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली आणि त्याने स्वतःच तिची हत्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे विचारपूस केली असता मामाची मुलगी हि सर्वांची लाडकी होती. सर्व नातेवाईक तिचे लाड करत असायचे. त्यामुळे संतापून तिला जवळच्या डोंगरात नेले आणि तिचा गळा दाबला आणि त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, अशी कबुली दिली.