तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : शहरातील बळीरामपेठ भागातील एक कापड दुकान फोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बळीराम पेठ भागातील संत कंवरराम मार्कटमध्ये गोवर्धन कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. १८ रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून १ लाख ४५ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान, ही घटना दि. ९ रोजी सकाळी दुकान मालक राजा दयालदास पारवानी (वय ५४) यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ शहर पोलिसात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनी सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.