Somvati Amavasya:
सनातन हिंदू परंपरेत सोमवती अमावस्या व्रताला विशेष महत्त्व आहे. यंदा हे व्रत श्रावण महिन्यात १७ जुलै रोजी पाळले जाणार आहे. १७ जुलै हा सोमवार असल्याने याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात.सोमवती अमावस्या हिला दीप अमावस्या असे देखील म्हटले जाते. याशिवाय दिव्याची पूजा केली जाते व संपूर्ण घरामध्ये दिवे लावले जातात. या दिवशी श्रावणच्या दुसऱ्या सोमवारचे व्रतही पाळले जाणार आहे. असे मानले जाते की या दिवशी जो भक्त भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतो त्याला महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते.
काय आहे सोमवती अमावस्या व्रताचे शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धती.
अनेक सनातन शास्त्रांनुसार, सोमवती अमावस्येच्या दिवशी श्राद्ध कर्म, तर्पण, स्नान आणि ध्यान करून भक्तांना अपार पुण्य प्राप्त होते. असे केल्याने पितरांचा मोक्ष होतो असे मानले जाते. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्याही दूर होतात. यावेळी सोमवती अमावस्येच्या दिवशी सोमवार व्रताचाही योगायोग असल्याने या दिवशी भगवान शंकराची आराधना करून भाविकांना महादेवाचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे.महादेवांना प्रसन्न कारण्यासाठी सोमवारी विशेष पुजा केली
हरियाली अमावस्या सोमवती अमावस्या १६ जुलै रोजी रात्री १०.०८ वाजता सुरू होईल, जी १८ जुलै रोजी सकाळी १२.०१ वाजता समाप्त होईल. मात्र, उदया तिथी वैध असल्याने सोमवार,१७ जुलै रोजी सोमवती अमावस्येचे व्रत पाळण्यात येणार आहे.
सकाळी लवकर उठून प्रथम आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला.
यानंतर, तुम्ही एका स्वच्छ चौकटीवर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड टाकून पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची स्थापना करा.
आता भगवान शिव आणि माता पार्वतीला उदबत्ती आणि नैवेद्य अर्पण करा आणि त्यांची आरती करा.