---Advertisement---

Ram Navami 2025 :  शिरपूरला आज श्रीरामरायांचा जन्मोत्सव

by team
---Advertisement---

शिरपूर : श्रीराम मंदिर देवस्थान (श्री भोंगे) शिरपूर येथे रविवारी (६ एप्रिल) श्री अयोध्याधीश राजाधिराज श्रीरामरायांचा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

बालाजी नगरी श्रीक्षेत्र शिरपूर येथील श्रीराम मंदिर देवस्थान यशवंत प्राथमिक विद्यालयासमोर श्रीराम जन्मोत्सव सोहळा चैत्र शुक्लपक्ष ९, रविवारी, भाविकांच्या उपस्थितीत होत आहे. या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम श्री क्षेत्र आळंदी, ह.भ.प. रामायणाचार्य प्रेममूर्ती मच्छिंद्र जिभाऊ महाराज (वाडीभोकर), खालचे गाव श्री बालाजी संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल, बाल ब्रह्मचारी १००८ महंत सतीशदासजी महाराज भोंगे (मठाधिपती श्रीराम मंदिर देवस्थान, शिरपूर) यांची प्रमुख उपस्थिती राहील.

६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १२ श्री महावैष्णव वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार वारकरी भजन-संगीत सेवा, दुपारी १२ वाजता बाल-ब्रह्मचारी रामकृष्ण उपासक, गौ सेवक १००८ महंत ह.भ.प. सतीशदास महाराज भोंगे तसेच माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, कृतिबेन पटेल यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते रात्री १२ पर्यंत अखंडपणे दर्शन सोहळा व तीर्थप्रसाद वाटप करण्यात येईल. चैत्र शुक्लपक्ष १०, सोमवारी (७ एप्रिल) श्रीराम नवरात्रोत्सवाच्या सांगतानिमि त्त महानैवेद्य आरती होऊन दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद भंडारा कार्यक्रम आयोजित केला आहे.

भाविकांनी या सोहळ्याचा, महाआरती, दर्शनाचा, तीर्थ प्रसाद व महाप्रसाद (भंडारा) याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी वे.शा.सं.मा. सागर संजय कुळकर्णी, वे.शा.सं. ह.भ.प. जयेश विवेक भोंगे, ह.भ.प. प्रथमेश प्रमोद भोंगे बाल-वारकरी विधीत जयेश भोंगे, ह.भ.प. प्रशांत रघुनाथ भोंगे उपस्थित राहणार आहेत

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment