तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ‘दगडी बँक’ म्हणून प्रसिद्ध आहे. सहकारातील एक आदर्श म्हणून या बँकेकडे पूर्वी पाहिले जात असे सर्वाधिक शाखा असलेली सहकारी शेतकऱ्यांची बँक असा या बँकेचा लौकिक होता. जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी या बँकेवर सत्ता गाजवली यातील बरीच राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळी होती. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला आदर्श संस्कारांची एक किनार होती अनेक संस्था या जिल्ह्यात वाढल्या बहरल्या आणि राज्यभरात त्याचा लौकिक पोचला त्या जिल्हा बँकेचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व मधुकरराव चौधरी माजी गृहराज्यमंत्री स्व जे. टी महाजन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्वर प्रल्हादराव पाटील स्व के एम बापू पाटील बँकेचे माजी अध्यक्ष व ओमकार आप्पा वाघ यांनी अनेक सहकार संस्थांची मुहूर्त मिळतील व त्या वाढविल्या या नेतृत्वासारखे आणखी काही जणांचे नेतृत्व या जिल्ह्याच्या सहकार विभागाला लागली आहे. मात्र नंतरच्या पिढीला हे फारसे जमले नाही.
उदाहरणार्थ घ्यायचे असेल तर दूध संघ एवढा तोट्यात गेला होता की त्याला टाळे लागणार होते मात्र एनडीडीबीने साथ दिल्याने तो उतरला व आता भरला आहे सहकारी साखर कारखान्यांचे उदाहरण म्हणजे मधुकर सहकारी साखर कारखाना वसंत सहकारी साखर कारखाना बेलगंगा सहकारी कारखाना या सहकारातील आदर्श संस्था होत्या. आज त्यांचे परिस्थिती काय संतांचे वैभव टप्प्याटप्प्याने लोप पावत गेले. काही ठिकाणी सहकाराचा सहकार झाला अति तेथे माती याची प्रचिती या कारखान्यांच्या क्षेत्रात आली हजारो हातांना रोजगार देणाऱ्या संस्था बंद झाल्या आता चालू आहे ते केवळ राजकारण आणि खाऊगिरी चे प्रकार साखर कारखाने खाजगी व्यवसायिकांना विक्रीचे प्रयत्न झाले काही ठिकाणी त्याला यशही आले.
जिल्हा बँकेचा विचार करता सहकार क्षेत्रातिलही संस्था आकार घेत आहे आता आरबीआय चे मोठे निर्बंध असल्यामुळे बरीच रिकामी कामे कमी झाली मात्र त्यातही सुरवात शोधली जाते सहकारातील या संस्था राजकीय आखाडे केल्यामुळे जास्तच वाद होत असतात जिल्हा बँकेचे क्षेत्र हे जिल्हास्तरीय असल्यामुळे ती आपल्याच पक्षाच्या ताब्यात कशी राहील असे प्रयत्न राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत असतात. कुरघोडीचे राजकारण सुरू असते नुकतीच याची प्रचिती ही आली राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या या संस्थेत पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवार दिला वेगळा आणि निवडून आले ते संजय पवार अनेक वर्ष जिल्हा बँकेत काम करणाऱ्या पवारांनी अगदी पवार नीतीचा वापर करत अध्यक्ष पद मिळवले राजकारणात फार काळ कोणी कोणाचे शत्रू नसते. सत्ता बदलली की समीकरणे बदलतात त्याची प्रचिती येथे आली धुरंधर राजकारणी म्हणून परिचित असलेले संजय पवार हे माजी आमदार पण बारामतीकरांच्या जवळचे म्हणून परिचित असले तरी सध्या ते भाजप शिवसेना युतीतील नेत्यांच्या बरोबर आहेत अगदी आत्तापर्यंत आमदार एकनाथराव खडसेंचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती मात्र आता त्यांनी दूध संघाच्या निवडणुकीपासून खडसेंची साथ सोडली आहे माजी आमदार स्वर्ग अण्णा पवार यांचे ते चिरंजीव आहेत मोठा राजकीय वारसा लाभलेल्या संजय पवार यांनी जिल्हा बँकेत अध्यक्षपदाची धुरामुक्ती सांभाळली यावेळी त्यांच्या अवतीभवती युतीचे पदाधिकारी होते हवे ते साध्य करून घेण्याची त्यांची राजकीय हातोटी आहे हे नुकत्याच झालेल्या निवडीवरून सिद्ध झाले आहे