---Advertisement---

शुभांशू शुक्ला होणार भारताचे दुसरे अंतराळवीर, ८ जूनला फ्लोरिडातून झेपावणार

---Advertisement---

ॲक्सिओम आंतरराष्ट्रीय स्पेसच्या अंतराळ स्थानकावरील चौथ्या व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून भारताचे शुभांशू शुक्ला पहिल्या अंतराळ उड्डाणासाठी सज्ज आहेत. ही मोहीम ८ जून रोजी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून स्पेसएक्सच्या फाल्कन -९ रॉकेटद्वारे प्रक्षेपित केली जाणार आहे.

ड्रॅगन अंतराळयानाचे प्रक्षेपण फ्लोरिडा येथील नासाच्या अंतराळ केंद्रावरून भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.४१ वाजेपूर्वी होणार आहे. त्यामुळे १९८४ मध्ये रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून राकेश शर्मा यांच्या अंतराळ प्रवासाच्या चार दशकांनंतर शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरतील.

ॲक्सिओम-४ मोहिमेचे वैमानिक शुक्ला यांच्याव्यतिरिक्त इतर सदस्यांमध्ये पोलंडचे उझनान्स्की विस्निविस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू पांचा समावेश आहे. हे दोन्ही पुरोपियन राष्ट्र इतिहासातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला प्रवास आणि ४० वर्षांपेक्षा जास्त काळातील सरकार प्रायोजित दुसरी मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे.

करणार विशेष प्रयोग

शुक्ला हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या सहकापनि नासाच्या मदतीने विकसित केलेले विशेष अन्न आणि पोषण संबंधित प्रयोग करतील, भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ प्रवासातील पोषण आणि स्वयंपूर्ण जीवन प्रणालींना चालना देण्याचा उद्देश या प्रयोगांमागील आहे.

  • सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात जाण्यासाठी आणि स्वतःहून अंतराळयानाचा अनुभव घेण्यासाठी मी खरोखरच खूप उत्सुक आहे. – अंतराळवीर शुभांशू शुक्ला
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment