ICC ODI Batting Rankings : न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा युवा सलमीवीर फलंदाज शुभमन गिल चांगलाच चमकला. गिलने तडाखेबाज फलंदाजी करत किवी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत गिलने दोन शतकांसह तब्बल ३६० धावा कुटल्या. या जबरदस्त कामगिरीच्या जोरदावर त्याने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे सीरिजमध्ये ३६० धावा कुटल्यानंतर शुभमन गिलने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये तब्बल २० स्थानांनी झेप घेतली.एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मध्ये सामील झाला आहे.
गिलने टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देखील मागे टाकलं. गिल आयसीसी क्रमवारीत ७३४ गुणांसह ६ व्या स्थानावर पोहचला आहे. गिलपाठोपाठ विराट कोहली ७ (७२७ गुण) आणि रोहित शर्मा ८ व्या (७१९ गुण) क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज ८२७ गुणांसह क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.