शुभमन गिलची इंग्लंडमधील कामगिरी अविश्वसनीय : युवराज सिंग

---Advertisement---

 

अलीकडील इंग्लंड दौऱ्यातील शुभमन गिलची कामगिरी अविश्वसनीय होती, विशेषतः पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी परदेशातील परिस्थितीत त्याच्या फलंदाजीवरील प्रश्नचिन्हांचा विचार करता त्याची कामगिरी प्रशंसनीय होती, अशा शब्दांत भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने कौतुक केले.

अलीकडील अॅण्डरसन तेंडुलकर कसोटी मालिकेदरम्यान गिलने चार शतके झळकावली व ७५४ धावा करून आघाडीचा धावपटू ठरला. या कामगिरीमुळे तो सेना देशात कसोटी मालिकेत ७०० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला आणि पाहुण्या संघाला पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणण्यास मदत झाली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अशवन या तीन दिग्गजांनी लागोपाठ कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर २५ वर्षीय गिलने कठीण दौऱ्यावर एका तरुण संघाचे नेतृत्व केले, ज्यामुळे संघात एक पोकळी निर्माण झाली.

परदेशात त्याच्या विक्रमावर अनेक प्रश्नचिन्हे होती. गिल कर्णधार झाला व त्याने चार कसोटी शतके ठोकलीत. जेव्हा तुम्हाला जबाबदारी दिली जाते तेव्हा तुम्ही ती कशी घेता हे अविश्वसनीय आहे, असे युवराजने ५० डेज टू गो महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळी आयसीसी डिजिटलला सांगितले.

भारतीय संघाचा खूप अभिमान आहे. जरी ही मालिका अनिर्णित राहिली असली तरी हा आमच्यासाठी विजय आहे. कारण हा एक तरुण संघ आहे आणि इंग्लंडमध्ये जाऊन चांगले खेळणे आणि स्वतःला सिद्ध करणे सोपे नाही, असेही तो म्हणाला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभपंत, आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांच्या दुखापतींमुळे आणि त्यांचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी केवळ तीन सामने खेळला तरीही, ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटीत सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून मालिका बरोबरीत आणल्याने भारताचा दृढनिश्चय दिसून आला. कोहली व रोहितसारख्या खेळाडूंशिवायही भारतीय संघाने आव्हान स्वीकारले, असेही युवराज म्हणाला.

हे खूप छान आहे. इंग्लंडमध्ये तरुण संघ जातो व दबावमुक्त खेळतो. युवा खेळाडू हळूहळू कोहली, रोहित शर्मा सारख्या खेळाडूंची जागा घेत आहात, ते सोपे नाही, असेही तो म्हणाला. युवराजने अष्टपैलू रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदरच्या प्रयत्नांचे कौतुक केले. जडेजा व सुंदरच्या भागीदारीमुळे भारताने मॅन्चेस्टरमधील चौथी कसोटी अनिर्णीत राखली.

तो क्षण कधीही पाहिला नव्हता

भारताने कसोटी मालिका अनिर्णीत केली, तो क्षणी खूप दिवसांत कधीही पाहिला नाही, वॉशिंग्टन आणि जडेजाने शतके झळकावली आणि कसोटी सामना अनिर्णीत केला, असे युवराज सिंग म्हणाला. जडेजा बऱ्याच काळ पासून संघात आहे. वॉशिंग्टन सुंदर एक तरुण खेळाडू म्हणून संघात येत असताना, त्याने जे केले ते अविश्वसनीय होते, असे युवराज शेवटी म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---