तरुण भारत लाईव्ह । ५ सप्टेंबर २०२३। यापुढे सिल्वर पापलेट हा महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती मस्त्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सातपाटीमधील मासेमार सहकारी संस्थांनी याबाबत मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्याबद्दल मागणी केली होती. ती आता पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ‘शेकरु’, महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’ बरोबरचं आता महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून सिल्वर पापलेट ओळखला जाईल.
पापलेट हा मासा परकीय चलन मिळवून देणारा असून त्यामुळे चवीसोबतच आर्थिक दृष्ट्या पण त्याचे महत्व आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट केले कि मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत करताना अतिशय आनंद झाला. या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. पापलेट मासा हा महागड्या माशांपैकी एक आहे कारण तो खुप कमी प्रमाणात सापडतो .
महाराष्ट्राचा राजमासा म्हणून आतापर्यंत कोणत्याच माशाच्या प्रजातीला मान्यता मिळालेली न्हवती. पण आता महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून सिल्वर पापलेट हा ओळखला जाणार आहे.