---Advertisement---

Jalgaon News : घसरणीनंतर पुन्हा वाढ, सोने दरात की चांदीत ?

---Advertisement---

जळगाव : चांदीच्या भावात घसरण झाल्यानंतर त्यात पुन्हा दोन हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख सात हजार २०० रुपयांवर पोहचली आहे. तर सोन्याच्या भावात २०० रुपयांची घसरण होऊन ते ९६ हजार रुपयांवर आले आहे.

---Advertisement---

सलग सहा दिवस चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्यानंतर सोमवारी चांदीच्या भावात एक हजार ८०० रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर मंगळवारी त्यात दोन हजार २०० रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीसाठी जीएसटीसह आता एक लाख १० हजार ४१६ रुपये मोजावे लागणार आहे.

गेल्या आठ दिवसात चांदीच्या भावात नऊ हजार २०० रुपयांची वाढ झाली आहे. २ जून रोजी चांदी ९८ हजार रुपयांवर होती. त्यात भाववाढ होत जाऊन शनिवारी एक लाख सहा हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचली. सोमवारी एक हजार ८०० रुपयांची घसरण झाल्यानंतर १० रोजी पुन्हा दोन हजार २०० रुपयांची वाढ झाली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---