एकमेकांना लोखंडी पाईपने मारहाण हुडकोत दोन गटातील सहा जण जखमी

---Advertisement---

 

जळगाव : लहान मुलांचे भांडणात समजविण्यासाठी गेलेल्या पित्यासह मुला मुलगी अशा तिघांना लोखंडी पाईपाने मारहाण केली म्हणून, तर दारुच्या नशेत नातेवाईकांना शिवीगार करत तिघांना लोखंडी पाईपने मारहाण केली. या घटनेत दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले. रविवारी (२९ मार्च) रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरात न्यु. ख्वॉजानगर हुडको येथे ही घटना घडली. याप्रकरणी परस्पर तक्रारीनुसार सात जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

उस्मान शहा इब्राहिम शहा (वय ५५, रा. न्यु. ख्वॉजानगर पिंप्राळा हुडको) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या लहान मुलीशी लहान मुलाचे भांडण सुरू होते. त्यांना समजुत घालण्यासाठी त्यांच्यासह मुलगा गेले असता संशयितांना त्याचा राग आला. शहा यांच्यासह त्यांची मुलगी व मुलाला लोखंडी पाईपने मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच धमकाविले. कुटुंबियांनी तिघांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात नेले. याप्रकरणी आरीफ नादर शेख, जुबेर शेख, आरीफ नादर शेख याचा जावई (सर्व रा. न्यु ख्वॉजानगर, पिंप्राळा, हुडको) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुबेर शेख हकीम (वय ३०, रा. न्युख्वॉजानगर हुडको) यांच्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री आठ नऊ वाजेच्या सुमारास न्यु. ख्वानगर हुडको पिंप्राळा येथे दारुच्या नशेत जुबेर शेख यांच्या नातेवाईकांना संशयित शिवीगाळ करत होता. या कारणावरुन शहा यांच्या सह त्यांचे मामा, तसेच जावई यांना संशयितांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने मारहाण केली. व धमकी दिली. जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारार्थ शासकीय रुग्णालयात हलविले. जखमीच्या जबाबानुसार याप्रकरणी आरोफा शहा, शहनाद शहा, जाफर शहा, उस्मान शहा पूर्ण नाव माहिती नाही. (सर्व रा. न्यु ख्वॉजानगर पिंप्राळा हुडको) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश माळी तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---