भडगाव: दोन दिवसांपासून बंद असलेल्या ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून चोरी केल्याच्या घटनमुळे शहरात खळबळ उडाली आहे. यात चोरटयांनी पाच ते सहा किलो चांदी व रोख रक्कम लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. हि घटना आज उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, भडगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले घोडके ज्वेलर्स दुकान मागील दोन दिवसांपासून बंद होते. याच संधीचा फायदा उठवत चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूची भिंत फोडून मोठ्या प्रमाणात चांदी व रोकड लंपास केली. शहराच्या मुख्य रस्त्यावर झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे गरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेने शहरातील व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ झाले असून पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
शहराच्या मुख्य भागात झालेल्या या घटनेमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Bhadgaon News: ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून सहा किलो चांदीसह रोकड लंपास
by team
Published On: March 18, 2025 3:54 pm

---Advertisement---