सुरत-भुसावळ पॅसेंजरसह सहा गाड्या या स्थानकातून सुटणार !

by team

---Advertisement---

 

भुसावळ : सुरत स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर स्थानक पुनर्विकासाच्या (फेज-1) कामासाठी काही गाड्यांच्या टर्मिनलमध्ये बदल करण्यात आला असल्याने सहा रेल्वे गाड्या आता सुरत रेल्वे स्थानकाऐवजी उधना स्थानकातून सुटणार आहेत. त्यता सुरत-भुसावळ पॅसेंजरसह छपरा, भागलपूर, अमरावती एक्स्प्रेसचा समावेश आहे तर सहा गाड्या या उधना स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सहा गाड्या सुरतऐवजी उधना स्थानकातून सुटणार

ट्रेन क्रमांक 19007 सुरत-भुसावळ पॅसेंजर 10 जून ते 7 सप्टेंबर 2024 दरम्यान उधना स्थानकातून 5.24 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 19005 सुरत-भुसावळ एक्स्प्रेस 10 जून ते 7 सप्टेंबर 2024 दरम्यान उधना स्थानकातून 11.30  वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 09065 सुरत-छपरा विशेष गाडी 17 जून ते 2 सप्टेंबरदरम्यान उधना स्थानकातून 8.35 वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 19045 सुरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस 12 ते 6 सप्टेंबरदरम्यान उधना स्थानकातून 10.20 वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 22947 सुरत-भागलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस 11 जून ते 7 सप्टेंबरदरम्यान उधना स्थानकातून 10.20 वाजता सुटेल तर गाडी क्रमांक 20925 सुरत-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस

13 जून ते 6 सप्टेंबरपर्यंत उधना स्थानकातून 12.30 वाजता सुटणार आहे.

सहा गाड्या उधना स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट

ट्रेन क्रमांक 19006 भुसावळ-सुरत एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 19008 भुसावळ-सुरत एक्स्प्रेस 9 जून ते 7 सप्टेंबरदरम्यान उधना स्थानकावर टर्मिनेट होईल तर  ट्रेन क्रमांक 20926 अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस 10 जून ते 7 सप्टेंबरदरम्यान तसेच ट्रेन क्रमांक 09066 छपरा-सुरत स्पेशल एक्स्प्रेस  12 जून ते 4 सप्टेंबरदरम्यान व ट्रेन क्रमांक 19046 छपरा-सुरत ताप्ती गंगा एक्स्प्रेस 9 जून ते 6 सप्टेंबरदरम्यान व ट्रेन क्रमांक 22948 भागलपूर-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस 10 जून 5 सप्टेंबरदरम्यान उधना स्थानकावर टर्मिनेट करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---