---Advertisement---
धुळे: शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील आठवड्यात एका सहा वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. ही घटना ताजी असतांना पिंपळनेर येथील वृदांवन नगरातील एका सहा वर्षीय बालिकेवर भटक्या कुत्र्याने हल्ला चढवून जखमी केले. तिच्यावर सध्या धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (१९ जुलै) रोजी घडली असून
शहरातील वृंदावन, अलकापुरी, संभाजीनगर आणि पंचमुखी कॉर्नर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः वृंदावन नगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास अधिक जाणवत असून, स्थानिक नागरिकांनी वेळीच उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मागील आठवड्यातही कुशांक राहुल भामरे (वय ६) या चिमुकल्यावर अशाच प्रकारे कुत्र्यांनी हल्ला केला होता. या घटना परिसरातील नागरिकांना व्यथित करणाऱ्या ठरत आहेत. नुकत्याच घडलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.आर्याला प्रथम पिंपळनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने तिची प्रकृती लक्षात घेऊन तिला धुळे येथे हलवण्यात आले.