अमळनेर बाजार समिती निवडणुकीत भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर

जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. आज जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे.  

अमळनेर बाजार समितीत भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर असून लवकरच विजयी श्रीची माळ त्यांच्या गळ्यात पडणार आहे. अमळनेर कृषीउत्पन्न बाजार समितीत सोसायटी मतदार संघात सुरशीच्या लढतीत बघावयास मिळाल्या. यात एकीकडे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनल समोर माजी आमदार स्मिता वाघ व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्व खाली पॅनल होते. यात सूत्रानुसार मिळालेल्या माहितीवरून महाविकास आघाडीचे पाच उमेदवार भाजप-शिंदे गटाचे एक उमेदवार व अपक्ष एक उमेदवार आघाडीवर आहे. 

यात दुपारी १.३० पर्यंत  मिळालेल्या माहितीनुसार स्मिता वाघ ४१७, अशोक पाटील ३९२, सुभाष पाटील ३७८, सुरेश पाटील २९३, डॉ. अशोक हिम्मत पाटील २७४, नितीन पाटील २३५, भोजमल पाटील २२९, जितेंद्र पाटील २२०, गोकुळ बोरसे २१४, राकेश मुंदडा १९८ अशी परिस्थिती आहेत.