Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसमध्ये धुसफूस ! दिलीप मानेचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप

#image_title

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, दिलीप माने यांना काँग्रेसकडून अखेरपर्यंत उमेदवारी अर्ज दिला गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे दिलीप माने यांना आज एबी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे.

दिलीप माने हेच काँग्रेसचे उमेदवार असतील असं सांगून देखील काँग्रेसनं त्यांना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळं प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने मोठा दगफटका केल्याचा दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसची उमेदवारी दिलीप माने यांनाचं मिळेल असं आश्वासनं देखील दिलं होते. मात्र, शेवटपर्यंत दिलीप माने यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळं माने यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने मोठा दगफटका केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा डोळ्यात अश्रू आले. दिलीप माने यांनी अपक्ष फ्रॉर्म मागे घेऊ नये असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

दिलीप माने काय म्हणाले?
मला शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघण्यासाठी सांगण्यात आलं होतं. ऐन वेळी मला एबी फॉर्म दिला नाही.एबी फॉर्म होता पण माझ्यापर्यंत पोहोचवला नाही असे माने म्हणाले. मी आता अपक्ष अर्ज दाखल केला, कार्यकर्त्यांना विचारून अर्ज ठेवण्याबाबतीत निर्णय घेईन असेही माने म्हणाले. काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असताना तो सोडला ही सगळी मॅच फिक्सिंग असल्याचे माने म्हणाले. प्रत्येक जण आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करतोय. आपली मुलगी, पत्नी कशी निवडून येईल यासाठी सगळं केलं जातं असल्याचे माने म्हणाले. ज्यांनी तिकीट जाहीर केलं त्यांची जबाबदारी होती की एबी फॉर्म देखील आणला पाहिजे. सगळेच यामध्ये कमी पडलेत. जिथं काँग्रेस उमेदवारला संधी न देता मित्र पक्षाला जागा सोडण्यात आली तिथं कोणीही विश्वास ठेवू नका असे माने म्हणाले.