…तर वाल्मिक कराड सुद्धा 302 अंतर्गत येतील, काय म्हणाले आमदार सुरेश धस ?

#image_title

बीडच्या खंडणी प्रकरणासह संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असल्याचा दावा केला जाणारा वाल्मिक कराड आज अखेर पुण्यात सीआयडीला शरण आला. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली. सीआयडीकडून त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे तो हत्या प्रकरणी नाही, खंडणी प्रकरणी शरण आल्याचं सांगितलं जात आहे.

वाल्मिक कराड याने आज पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये शरणागती पत्करली आहे. सीआयडी गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. त्याच्या शोधासाठी CID कडून मोठा प्रयत्न सुरु होते आहे. त्यासाठी आज चार विशेष पथकं रवाना करण्यात आली होती. पण अखेर वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केले आहे.

सीआयडीकडे आत्मसमर्पण केल्यानंतर आता सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे त्याची चौकशी करत आहेत. वाल्मिक कराडबरोबर परळीमधील दोन नगरसेवक सुद्धा उपस्थितीत आहेत. वाल्मीक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर सीआयडी ऑफिस परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. दरम्यान या प्रकरणावरती आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सुरेश धस ?

वाल्मिक कराड हा काही स्वखूशीने शरण आला नाही. त्याची मालमत्ता जप्त करण्यात येणार होती. त्याच्या पत्नीला चौकशीला घेऊन येणार होते. तर त्याची बँक खाती गोठवण्यात आली होती. त्यामुळे तो सीआयडीकडे शरण आल्याचा दावा आमदार धस यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घातले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ॲक्शन घेतल्यानंतर आका शरण आल्याचा दावा धसांनी केला.

तर ते 302 अंतर्गत येतील

आमदार धस यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सर्वात सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणी मध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेले आहे विष्णू चाटे हा आता सध्या 120 ब मध्ये घेतलेला आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवले असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये 302 मध्ये येईल, तर याप्रकरणात वाल्मिक कराड शरण आलेला आहे. त्याच्यावर सध्या 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल होतोच आपल्या अंदाजाप्रमाणं जर त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 अंतर्गत येतील, असे वक्तव्य धस यांनी केले.