जळगाव : उत्तर महाराष्ट्र युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवासेना समन्वयक प्रथमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक बाबी देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार, युवासेना जळगाव जिल्हा शाखेतर्फे अभिनव विद्यालय प्रतापनगर जळगाव येथील २५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या व लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी, ॲड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान येथे २०० गरजूंना अन्नदानही करण्यात आले. जिल्हाध्यक्ष रोहित कोगटा यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत, त्यांना यशस्वी भविष्यासाठी प्रेरित केले. युवासेना पदाधिकारी सचिन सोनार, शंतनू नारखेडे, पवन ठाकूर, प्रवीण बिऱ्हाडे, आकाश जाधव, अविनाश पाटील, नीरज वाणी, दीपक पाटिल, विशाल निकम, विजय यादव, विवेक बारी, राकेश सोनवणे, सागर हिरवाळे, सनी सोनार, यश सोनवणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नीता पाटील यांनी केले, तर आभार व्यक्त करण्याचे काम संतोष सपकाळे यांनी केले. कार्यक्रमासाठी शालेय मुख्याध्यापक हेमंत पाटील, सरोज तिवारी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.