---Advertisement---

Crime News : अंघोळीला गेला, पण बाहेरच नाही आला; दरवाजा तोडताच समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले

by team
---Advertisement---

मंद्रूप : बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी घडली. विनायक नागनाथ कुंभार (वय १७, रा. कुंभार गल्ली, मंद्रूप) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

विनायक कुंभार सकाळी उठून अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्याने त्याच्या वडिलांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने दरवाजा तोडून पाहिले असता, त्यांना मुलगा खिडकीला टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तातडीने मुलाला खाली उतरवून उपचारासाठी मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : पत्नीने सांगितलं लग्नाआधीच एक सत्य, ऐकताच नवऱ्याने उचललं ‘हे’ पाऊल

रुग्णालयात डॉक्टरांनी त्याची तपासणी करून उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे कुंभार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विनायक हा मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. त्याने कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वडील नागनाथ कुंभार यांनी पोलिसात खबर दिली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीमंत जाधव करीत आहेत.

हेही वाचा : ब्रेकअप केलं म्हणून प्रियकराचं संतापजनक कृत्य, खोटं कारण देत बोलावलं रात्री अन्…

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. विनायक अभ्यासू आणि शांत स्वभावाचा मुलगा असल्याने त्याच्या आत्महत्येने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment