खुशखबर : नशिराबादमध्ये उभारणार सौर उर्जा प्रकल्प ; पालकमंत्र्यांची घोषणा

नशिराबाद :  नशिराबाद शहरासाठी स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा याकरिता विजेसाठी नवीन सोलर प्रकल्प राबण्यात येण्यासाठी तब्बल 5 कोटी रु. निधी मंजूर करणार असून नशिराबाद भुयारी गटार योजना अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर त्यास मंजुरी मिळवून शहराच्या विकासाला गतीमान करण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले ते नगरपरिषद मार्फत दिव्यागं कल्याणकारी योजना अंतर्गत शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वाटप कार्यक्रम प्रसंगी केले.

नशिराबाद नगरपरिषद झाल्यापासून सफाई कर्मचारी यांना ग्रामपंचायतच्या दराप्रमाणे वेतन मिळत होते. सफाई कर्मचारी यांचे वेतन वाढ करण्याबाबत मागील बऱ्याच दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत गांभीर्य पूर्वक  दखल घेवून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा  केली होती. त्यानुसार  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या  निर्देशानुसार नशिराबाद मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी नगर परिषदेच्या ४२ सफाई कामगारांना किमान वेतन प्रमाणे वेतन वाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे नगर परिषद कर्मचारी यांनी ना. गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले तर नगर परिषद मार्फत दिव्यागं कल्याणकारी योजना अंतर्गत शहरातील ४०० दिव्यांग लाभार्थ्यांना निधी वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कार्याक्रमचे प्रास्ताविक माजी सरपंच विकास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन  बी. आर. खंदारे सर यांनी केले तर आभार मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांनी मानले. यावेळी माजी उपसरपंच किर्तीकांत चौबे, विकास पाटील जि.प.चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी नशिराबाद नगरपरिषद झाल्यापासून दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांना वेतन वाढ झाली आहे. शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे मंत्री गुलाबराव पाटील यांचे सर्वच स्तरावरून कौतुक  होत असल्याचे सांगून  नशिराबाद शहरासाठी स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा याकरिता विजेसाठी नवीन सोलर प्रकल्प मंजूर करण्याची मागणी केली. यावेळी मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांचा करीत असलेल्या उत्कृष कामामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे,  जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख  विकास धनगर, किर्तिकांत चौबे, युवसेनेचे  चेतन बऱ्हाटे, चंद्रकांत भोळे, प्रदीप साळी, चंद्रकांत भोळे, प्रकाश माळी, निळकंठ रोटे, किरण पाटील , योगेश पाटील व लेखापाल दौलत गुट्टे, मनोज गोरे, अभियंता अतुल चौधरी, सचिन पल्हाडे, संतोष रगडे, न. प. अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग बांधव, व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.