---Advertisement---

Jalgaon News : अंगावर हळदीचा रंग अन् बॉर्डरवर हजर राहण्यासाठी फोन, कर्तव्याला प्राधान्य देत सीमेवर रवाना झाला ‘जवान’

---Advertisement---

जळगाव : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, भयानक युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. सुट्टीवर आलेल्या जवानांना तातडीने बोलावण्यात आले आहे.

अशात खेडगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील हे आज गुरुवारी सीमेवर रवाना झाले. विशेषतः मनोज यांचे सोमवारी लग्न झाले, हळदीचा रंग अंगावर असतानाच त्यांना कर्तव्यासाठी फोन आला. त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला. यावेळी देशापेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्या आहेत.

सन २०१७ मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा ५ रोजी विवाह झाला. देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना त्वरेने बोलावणे आले आहे. त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक आज गुरुवारी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला.

लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले मनोज ज्ञानेश्वर पाटील हे नंदीचे खेडगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज गुरुवारी सीमेवर रवाना होत आहे.

पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते, पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले आहे.

पत्नीनेही दिला पाठिंबा

कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना गर्व आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्या आहेत. मनोज यांची पत्नी यामिनी यांनीदेखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment