जळगाव : महापालिका क्षेत्रातील नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. ते नियमित करपट्टी भरुन सुध्दा नागरी मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. परंतु, मनपा आयुक्त हे आपल्या कामात विनाकामाचे व्यस्त आहात का….? असा प्रश्न प्रहार जनशक्ती पार्टीतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. या समस्यांचा फोटोसह निवेदन मनपा आयुक्तांना बुधवार, ११ सप्टेंबर रोजी देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा की, जळगाव शहरातील ठिकठिकाणचे वाहतूक सिंग्नल बंद अवस्थेत असून ते त्वरित कार्यन्वित कारण्यात यावेत. शहरात अनेक लहान मुले तसेच नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने जखमी केले आहे. महापालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. शहरातील कचरा गोळा करण्याचा मक्ता हा वॉटरग्रेस कंपनीला दिलेला आहे. मात्र, शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा झालेले दिसतात. महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात बार कोड पद्धत लागू करावी. या विभागात नागरिकांना अर्ज केल्यानंतर १५ ते २० दिवस चकरा मारल्यानंतर दाखल मिळत आहे. हे टाळण्यासाठी बार कोड लागू करा. शहरातील रस्त्याचे कामाचे नियोजन शून्य असून रस्त्यावरील खड्डे आहे ते तसेच आहेत, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. त्या त्वरित सोडविण्यात याव्यात असे निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे, महानगराध्यक्ष प्रवीण पाटील, जतिन पंड्या, विजय पाटील, पंकज पवार आदींची सांगितले आहे.