जळगाव : पिप्राळ्यातील सोनी नगर , प्रल्हादनगर भागांमध्ये नागरी सुविधांचा अभाव असुन वेळोवेळी मागणी करून देखिल यावर मनपा दुर्लक्ष करीत असल्याने 27 रोजी मनसेचे पदाधिकारी व नागरीकांनी महापालीकेवर धडक देवून आयुक्त पल्लवी भागवत यांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसात जनतेच्या समस्या सोडविण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने तिव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे महानगरअध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला.
निवेदनात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या प्रल्हाद नगरमध्ये अद्याप पर्यत अमृत योजनेची पाईपलाईन नसुन पाईप लाईन टाकुन मिळावी. सोनी नगरातील विद्युत खांबावर पथदिव्यांसाठी फेजतार टाकुन मिळावे. नविन विद्युत खांबावर पथदिवे लावून मिळावे. मनपाकडे साहित्य उपलब्ध असुन सुध्दा पथदिवे लावण्यास टाळाटाळ का केले जाते. सावखेडा रोड ते सोनी नगर रात्री अंधार असल्याने ओकांर पार्क, श्रीराम नगर, गणपती नगर कडे महिलांना पायी जातांना जिव धोक्यात घालुन पायदळ जावे लागते. त्यामुळे दारू अड्डयाजवळचा सावखेडा मेन रोडवरील विद्युत खांबावर नविन पथदिवे लावण्यात यावे. सोनी नगरातील पथदिव्यांचा विजेचा कनेक्शन गणपती नगर मधील एका विद्युत पोलवर दिला असुन तो सोनी नगरातच देण्यात यावा. रोज रात्री 9 वाजता पथदिवे बंद होतात त्यामुळे सोनी नगरात अंधार असल्याने भुरटे चोर फायदा घेतात. दोन तीन सायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत.
पथदिवे नियमित सुरू करावे
प्रल्हाद नगरातील विद्युत खांबावर पथदिवे आहेत पण ते गेल्या महिना भरापासून बंद असून सुरू करण्यात यावे.तसेच अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आली नाही.
निवेदन देतांना मनसेचे महानगरअध्यक्ष आशिष सपकाळे, श्रीकृष्ण मेंगडे, सोनी नगरातील नरेश बागडे,हेमराज गोयर,विजय चव्हाण दिनेश जाधव, प्रल्हाद नगरातील, दिपक सोनार, जितेंद्र पिंगळे,अपर्णा निकम,दिपीका पिंगळे,अंजली बडगुजर संगिता सोनवणे, विशाल वाल्हे, दिनकर बडगुजर,दामोदर आडेकर,अशोक पाटील,राजेंद्र बडगूजर, राजेश राजपुत, उदय राजपुत, सोनी नगर, प्रल्हाद नगर,गणपती नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.