एरंडोल विधानसभा महायुतीतून ‘भाजप’ला मिळावी, कोणी केली मागणी

पारोळा : अविकसित  मतदारसंघाच्या विकासासाठी एरंडोल विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीत महायुतीतून भारतीय जनता पार्टीला मिळावा, अशी मागणी भाजपच्या पारोळा तालुकास्तरीय अधिवेशनात राजकीय प्रस्ताव मांडताना माजी उपनगराध्यक्ष डॉ. मंगेश तांबे यांनी केली. या प्रस्तावाला माजी उपनगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांनी अनुमोदन दिले. हे अधिवेशन शनिवारी पार पडले.

व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन (धरणगाव) अधिवेशनाचे प्रमुख वक्ते अमोल पाटील (भडगाव), माजी खासदार ए. टी. पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, सुरेंद्र बोहरा, अॅड. अतुल मोरे, जिल्हा चिटणीस नाना पाटील, अॅड. कृतिका आफ्रे उपस्थित होते.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केले. त्यांनी संघटनेचा आढावा मांडला. शोक प्रस्ताव शालिक पवार यांनी मांडला. अॅड. अतुल मोरे, गोविंदा शिरोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते अमोल नाना पाटील यांनी राज्य केंद्र या सरकारने केलेल्या कामाचा आढावा मांडला. राज्य सरकारने काढलेल्या नवीन योजनांची माहिती दिली. माजी खासदार ए. टी पाटील यांनी आगामी निवडणुका हे महायुती म्हणून लढायचे असून कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन केले. अधिवेशनाचा सम  ारोप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी केला. आभार जितेंद्र चौधरी यांनी मानले. तालुका भाजप पदाधिकारी, गटप्रमुख, शक्ती केंद्रप्रम ख, सुपर वारीयर्स व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते