Nandurbar Suicided News: मुलाचं प्रेमप्रकरण, वडिलांना ब्लॅकमेल, अखेर उचललं टोकाचं पाऊल

नंदुरबार : समाजामध्ये प्रेमप्रकरणातून होणाऱ्या बदनामीच्या त्रासाला कंटाळून मुलाकडून किंवा मुलीकडून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचललं जाण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. अशा कठीण प्रसंगी पालकांनी मुलांना सांभाळण्यासाठी पुढे येणे गरजेचे असताना अशाच एक प्रकरणात मुलाच्या वडिलांनीच झाडाला गळफास घेत बुधवार, २  रोजी आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.  कनिलाल मांगिलाल गावीत (वय ४९) असे मृताचे नाव आहे.

 

कनिलाल गावित यांचा मुलगा गावातील एका मुलीच्या प्रेमात होता. यातून कनिलाल यांना तुमच्या मुलाला प्रेम प्रकरणातील मुलीशी लग्न करायला सांगा, तसेच १०  लाख देण्याची मागणी करण्यात आली. त्यांच्याकडे पैशांचा मागणीत वाढ करत ब्लॅकमेल करण्यात येत होते. पैसे न दिल्यास अत्याचाराचा गुन्हा दखल करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली.

हा सर्व त्रास सहन न झाल्याने कनिलाल यांनी बुधवारी गावातील झाडाला गळफास घेत आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचललं.  याप्रकरणी मृताच्या मुलांने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक तपास प्रभारी अधिकारी विवेक पाटील करत आहेत.