Oil Price : दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोयाबीनचे दर गेले दीड महिना स्थिर होते. मात्र आता त्यात पुन्हा वाढ झाली असून, ग्राहकांना घरगुती बजेट सांभाळणे कठीण होणार आहे.
जळगावात सोयाबीन तेलाचे दर प्रति किलोमागे ६ ते ८ रुपयांनी वाढले आहेत. महिन्याभरापूर्वी हे दर १२७ ते १३५ रुपये प्रति किलो होते, जे आता १३३ ते १४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले आहे आणि यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही वाचा : मुस्लिम तांत्रिक, अल्पवयीन मुलीला अर्ध्या रात्री बोलावलं अन्; गावात खळबळ
दरवाढीची कारणे
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नवे जागतिक आयात धोरण आखले आहे. या धोरणांतर्गत,
- सर्व प्रकारच्या आयात मालावर १०% शुल्कवाढ,
- चीनच्या आयातीवर ६०% शुल्कवाढ,
- कॅनडा व मेक्सिकोच्या आयातीवर २५% शुल्कवाढ विचाराधीन आहे.
या धोरणांचा जागतिक तेल बाजारावर परिणाम झाला असून त्याचा फटका भारतीय बाजारालाही बसत आहे.
आगामी काळात दरवाढीची शक्यता
विशेषतः सणासुदीच्या हंगामानंतरही ही दरवाढ थांबण्याची शक्यता कमी असून आगामी काळात तेलाचे दर आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक नियोजन करताना आणखी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.