---Advertisement---

Soygaon Crime News : वृद्ध दाम्पत्याला मारहाण ; ५० हजाराचा ऐवज लंपास

by team
---Advertisement---
सोयगाव :  मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द दाम्पत्याला जबर मारहाण करीत घरातील ५० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना मंगळवार .१० मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली.यात वृध्द दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.
फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा येथील शेतवस्तीवर वृध्द दाम्पत्य वास्तव्यास होते. घरात दोघेच राहत असल्याचा फायदा काही अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी घेतला.व मंगळवारी मध्यरात्री घराच्या पाठीमागे असलेल्या दरवाज्यातून आत प्रवेश करून वामनराव नाईक(चव्हाण) व पत्नी गंगादेवी नाईक या दोघा पती पत्नीवर हल्ला चढवीत हातातील हत्याराने दोघांच्या डोक्यात वार केले. यात दोघांच्याही डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली. यादरम्यान,दोघांचेही हातपाय बांधून घरातील कपाटात ठेवलेले ३५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम मंगळसूत्र व १५ हजार रुपये किमतीचे दहा भार चांदीची चैनपट्टी असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना गावकऱ्यांच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी बुलढाणा येथे रवाना केले.मात्र,डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
फिर्यादी गंगादेवी वामनराव नाईक(चव्हाण) वय.६५ (रा.घाणेगाव तांडा) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेसंदर्भात अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे,पोऊनि सुग्रीव चाटे,राजेंद्र साळवी,मिरखा तडवी,प्रकाश कोळी,आनंद पगारे हे करीत आहे.
---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment