युवकांच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न करणार : ना. रक्षा खडसे

अडावद ता.चोपडा :  रावेर लोकसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करित असतांना शेतकरी व महिला वर्गासाठी विशेष परिश्रम घेतल्याने तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून जाण्याचा बहुमान मिळाला आणि यामुळेच आता आपल्या आशिर्वादाने केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी मिळाली. युवक कल्याण व क्रिडा खात्याचे मंत्री पद मिळाल्याने आता युवकांच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ना. रक्षा खडसे यांनी दिली.

केंद्रीय मत्रीपद मिळाल्यानंतर अडावद ता. चोपडा येथे आज शनिवार,  ६ रोजी आयोजित भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. चोपडा तालुक्यातून विशेषतः अडावद गावाने मला नेहमीच मताधिक्क दिले असून अडावद येथील युवक, खेळाडू यांच्या उत्कर्षासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे गौरवोद्गार रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा केंद्रिय युवक कल्याण व क्रिडा राज्य मत्री ना. रक्षा खडसे यांनी काढले. यावेळी व्यासपिठावर अडावदचे सरपंच बबनखा तडवी, भाजपाचे माजी जि.प. सदस्य शातांराम पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, माजी प.स. सभापती रमेश पवार, माजी जि. प. आरोग्य सभापती दिलीप पाटील, मधुकर कासार हे उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी अडावद हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी केली. नागरी सत्काराला उत्तर देतांना ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न जिव्हाळ्याचा असून त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. तसेच अडावदसह परिसरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी रखडलेली बंधाऱ्यांची कामे व लघु बंधारे सारख्या लहान प्रकल्पांचे कामही मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, प्रकाश पाटील, साखरलाल महाजन, हनुमंत महाजन, रविकांत पिंपरे, कबिरोद्दीन शेख, वजाहतअली काझी, जुनेद खान, प्रेमराज पवार, उमेश कासट, सुरेश बाहेती, कमलाकर भोई, मोहन माळी, मनोहर पाटील, के.आर. कंखरे, पी. डी. सैदाणे, रविंद्र चव्हाण, नारायण महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.जी. महाजन यांनी केले. याप्रसंगी अडावदसह परिसरातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ग्रा. प. सदस्य, महिला भगिनी, भाजपाचे कार्यकर्ते व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.