Mahakumbh 2025: महाकुंभसाठी वलसाड ते दानापूर दरम्यान धावणार विशेष रेल्वे गाडी

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक प्रवास करत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुरक्षित होण्यासाठी रेल्वे प्रशासना तर्फे विविध उपाय योजना करण्यात येत आहे. त्याअंतर्गत  वलसाड ते दानापूरदरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने  घेतला आहे.

गाडीचे वेळापत्रक

कुंभ मेळा विशेष गाडी क्रमांक 09019 दिनांक 23.02.2025 रोजी वलसाड येथून 08:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 18:00 वाजता दानापूर येथे पोहोचेल.

कुंभ मेळा विशेष गाडी क्रमांक 09020 दिनांक 24.02.2025 रोजी दानापूर येथून 23:30 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 09:30 वाजता वलसाड येथे पोहोचेल.

हेही वाचा : गाडीचा कट लागल्याच्या वादातून रिक्षाचालकाकडून माजी आमदाराचा खून, घटनेमुळे सर्वत्र खळबळ

थांबे: नवसारी,भेस्तान,   नंदुरबार,अमळनेर,भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी,मिर्झापूर चुनार, पंडित दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा आणि दानापूर.

कोच संरचना: 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 5 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 14 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन

या विशेष गाड्यांच्या विस्तृत वेळापत्रक व थांब्यांची  माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल  काटा