---Advertisement---
स्वयंपाक करताना चहा, दूध, तेल आणि भाज्या यासारख्या गोष्टी गॅसच्या शेगडीवर पडणे अगदी सामान्य आहे, ज्यामुळे गॅस स्टोव्ह अनेकदा काळसर, घाण आणि तेलकट होतो. लोकांना ते साफ करणे खूप कठीण जाते गृहिणींना स्वयंपाक करताना या सर्व गोष्टीनकडे लक्ष द्यावे लागते आणि म्हणून लोक अनेकदा गॅस स्टोव्हच्या साफसफाईकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे घाण अधिक वाढते आणि बर्नरमधून बाहेर पडणारी ज्योतही कमी होते. गरम पाणी, लिंबू आणि एनो तर जाणून घ्या गॅस ची साफसफाई कशी करायची
गॅस स्टोव्हवरील डाग दूर करण्यासाठी
१] लिंबू हा उत्तम घरगुती उपाय आहे. यासाठी प्रथम एका भांड्यात गरम पाणी घ्या. आता त्यात लिंबाचा रस घाला. यानंतर इनो फ्रूट सॉल्ट टाका. आता या द्रावणात बर्नर किमान दोन तास भिजवा. आता दोन तासांनंतर, बर्नरला जुन्या टूथब्रशने डिश वॉशिंग लिक्विड किंवा साबणाच्या मदतीने साफ करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेटल स्क्रब देखील वापरू शकता.पाणी आणि व्हिनेगरचा असा करा वापर
२] पाणी आणि व्हिनेगरचा वापर करुन देखील तुम्ही गॅस स्टोव्हवरील बर्नर साफ करु शकता. यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी आणि व्हिनेगर मिसळा. आता त्यात बेकिंग सोडा टाका आणि बर्नर एक ते दोन तास भिजवा. दोन तासांनंतर, बर्नर काढा आणि डिश वॉशिंग लिक्विडसह जुन्या टूथब्रशने स्क्रब करा. आता दोन्ही बर्नर कोरडे करुन मगचा त्यांचा वापर करा.