रुग्णसेवातून मिळते आत्मिक समाधान : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : ग्रामीण व शहरी भागातील गरजू रुग्णांना आणि डोळ्यांच्या संपूर्णपणे मोफत ऑपरेशनसाठी नेहमी आपण प्राधन्य दिले असून त्यासाठी नेहमीच मदतीचा हात दिला जातो. सर्वसामान्याच्या सेवेसाठी यापुढेही खंबीरपणे उभा राहणार असून गरजू रुग्णांना मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असून रुग्णसेवेतून नेहमीच आत्मिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाथरी येथील श्री. विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित नेत्र तपासणी शिबिरात बोलत होते.

या शिबिराचे आयोजन GPS ग्रुप व  भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल  जी. पी. एस ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या शिबिरात पात्र झालेल्या सुमारे 61 व्यक्तीना  मोफत आधुनिक पद्धतीने डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करण्यासाठी मुंबई – पनवेल येथील नामांकित असलेल्या आर झुनझुनवाला शंकरा हॉस्पिटल येथे पाथरीहून रवाना करण्यात येणार आहे.  कार्याक्रमचे प्रास्ताविकात दुध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन शिरीष पाटील सर यांनी केले.  आभार सरपंच   सौ. सरपंच श्रीमती वैजांताबाई शिरसाठ यांनी मानले. यावेळी डॉ. राकेश आणि डॉ. आश्विन पाटील यांनी 235 रुग्णांची नेत्र तपासणी करून यातील 61 रुग्ण ऑपरेशनसाठी पात्र ठरविले .

यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच वैजांताबाई शिरसाठ, उपसरपंच पंडित महाजन, ग्रा. पं.सदस्य पृथ्वीराज चव्हाण,दिपक जाधव , दिपक गव्हाळे,  गोरख पाटील, समाधान धनगर, प्रतिभा पाटील, सौ. ज्योती पाटील, लताबाई भिल्ल, युवा सेनेचे सागर पाटील,  दिपक पाटील,.भूषण बाविस्कर. रोशन जाधव पोलिस पाटील, संजीव लंगरे, ग्रामसेवक श्री. सतिष पाटील, ग्रां. प कर्मचारी मुरली नेटके यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.