उद्यापासून श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी महोत्सव सोहळा

xr:d:DAFtd8oCXa8:2575,j:5027567302143702697,t:24040810

जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थांचे विद्यमाने श्री सद्गुरु अप्पा महाराजांनी प्रारंभ केलेला ‘श्रीरामनवमी’ महोत्सवास चैत्र शुद्ध प्रतिपदा ९ एप्रिल गुडीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे. गुढीपाडवा या दिनी पहाटे ५ वाजता काकडा भजन, काकडा आरती होऊन क्रोधीनाम संवत्सरानिमित्त (नुतनवर्ष) जलग्राम वासी यांच्या सुखशांतीसाठी श्री सद्गुरु अप्पा महाराजांचे विद्यमान वंशज हभप मंगेशजी महाराज जोशी यांच्या हस्ते ग्रामदैवत प्रभुश्रीरामास महापुजा अभिषेक सेवा होईल. ध्वज व गुढीपूजन नुतन वर्ष पंचांग पुजन होऊन सकाळी ७.३० वाजता प्रभूरामरायांची महाआरती होईल. सकाळी १२ वाजता महानैवेद्य आरती होईल दुपारी ४ ते ६ या ‘वेळात जळगाव नगरीतील विविध महिला मंडळांची भजनसेवा होईल.संध्याकाळी यात ९ एप्रिल मंगळवार दिनी श्री समर्थ भजनी महीला मंडळ (रामपेठ), १० एप्रिल दिनी श्रीसंजीवनी भजनी महीला मंडळ (महाबळ कॉलनी). ११ एप्रिल दिनी जय श्रीकृष्ण महीला मंडळ. १२ एप्रिल दिनी राष्ट्र सेविका समिती भजनी महीला मंडळ जळगाव, १३ एप्रिल दिनी शिवतांडव महिला मंडळ जयनगर, १४ एप्रिल भक्ती भजनी महीला मंडळ (बालाजी पेठ ), १५ रोजी श्री मोरया भजनी मंडळ मारुती पेठ, १६ एप्रिल स्वरसुधा भजनी महिला मंडळ जुनी पोस्टल कॉलनी,
१२ एप्रिल विशेष कार्यक्रम एकदिवसीय श्रीराम यज्ञ होईल. १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी दिनी पहाटे ४ ते ७ प्रभु श्रीरामांना महाभिषेक, महाआरती होऊन श्रीराम मंदिर संस्थान उत्तराधिकारी हभप श्रीराम महाराज यांचे श्रीराम जन्म सोहळ्याचे वारकरी सांप्रदायिक कीर्तन सेवा होईल. माध्यान्ह समयी श्रीराम जन्म सोहळा साजरा होउन महाआरती होईल. संध्याकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ संध्याकाळी ६:३० वाजता संध्या आरती लगेच ब्रह्मवृंद मंडळींचा शांतीपाठ घोष, रात्री ७:३० वाजता वा. गीतरामायणाची सेवा संस्कार भारती (जळगाव)चे साधक कलावंत सादर करतील. १८ एप्रिल दिनी सकाळी १० ते १२ गोपाळकाल्याचे भजन होईल. या महोत्सवाप्रसंगी भाविकांनी भजन, कीर्तन श्रवणाचा व ग्रामदैवत प्रभु श्रीरामांचे दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती, वहिवाटदार प्रमुख विश्वस्त हभप मंगेश महाराज जोशी केले आहे.