स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC ने विविध विभागांमध्ये कॉन्स्टेबल GDच्या 39481 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया गुरुवार 5 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना SSC GD 2025 कॉन्स्टेबल भरती परीक्षेत बसायचे आहे ते आयोगाच्या अधिकृत वेबसाइट – ssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आहे.
ही भरती प्रक्रिया BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB विभागांमध्ये केली जाईल. इच्छुक उमेदवार SSC ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज 5 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
रिक्त पदांचा तपशील आणि पदसंख्या
1) सीमा सुरक्षा दल (BSF) 15654
2) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 7145
3) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) 11541
4) सशस्त्र सीमा बल (SSB) 819
5) इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) 3017
6) आसाम रायफल्स (AR) 1248
7) सचिवालय सुरक्षा दल (SSF) 35
8) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) 22
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
वयाची अट काय?
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे. 1 जानेवारी 2025 रोजी वयाची गणना केली जाईल. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत कोणतीही सवलत नाही, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे.