वांद्रे टर्मिनलवर चेंगराचेंगरी; 9 प्रवासी गंभीर जखमी, 2 जणांची प्रकृती चिंताजनक, काय घडलं?

#image_title

Bandra Terminus station: उत्तर प्रदेश आणि बिहारमधून इतर राज्यातून कामासाठी आलेले लोक दिवाळी व छठ पूजा या सणांसाठी आपापल्या घरी जातात. यावेळी रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर मोठी गर्दी दिसून येते. याबाबतच मुंबईमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वांद्रे टर्मिनलच्या फलाट क्रमांक 1 मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाले आहे.

वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस गाडीने दिवाळीला गावी जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटे 3 वाजल्यापासून स्थानकावर गर्दी केली होती. गाडी फलटवर येताच प्रवाश्यांची जागा मिळवण्यासाठी धावपड सुरु केली. या धावपडीचे रूपांतर थोड्याच वेळात चेंगराचेंगरीत झाले. यात 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी वांद्रे टर्मिन्समधून गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस होती. ही गाडी सकाळी5.15 मिनिटांनी वांद्रे टर्मिन्समधून सुटते. ही गाडी मध्यरात्री 2.44 मिनिटांनी यार्डात येते. ही गाडी वांद्रे टर्मिन्सकडे येत असताना काही प्रवाशांनी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नका, असे आम्ही पुन्हा एकदा आवाहन प्रवाशांना करत आहोत. गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त प्रमाणात गाड्या यंदा सुट्टीच्या काळासाठी सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आवाहन आहे की त्यांनी संयमाने ट्रेनमधून प्रवास करावा, असे विनीत अभिषेक यांनी म्हटले.