जळगाव : गरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी व आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला असून अनाथ विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक बाबींसाठी पालकत्व स्वीकारली असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सतत संघर्ष करून लढत रहा यश निश्चित मिळेल. अनाथ व गरीब गरजू मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून पुढील शिक्षणासाठी अनाथ मुलांच्या मागे “आधारवड” म्हणून खंबीरपणे उभा राहणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी केले. ते अनाथ व गरीब गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम प्रसंगी पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मोलाचा हातभार विद्यर्थ्यांसाठी ठरणार आधार !
शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अनाथ व गरीब गरजू मुलांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले आहे. सामाजिक भान ठेवून माणुसकीचे दर्शन घडविले असून त्यांनी केलेला मोलाचा हातभार या विद्यार्थ्यांसाठी आधार ठरणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यात सुमारे ११०० अनाथ व गरीब गरजू मुलांना स्कूल बॅग, वह्या, कंपास पेटी, पाण्याची बॉटल व विविध स्वरूपाचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मुकुंदराव नन्नवरे, संजय पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
“जीपीएस मित्रपरिवार” व “विकी बाबा युवा मंच” ने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून अनेक मदतीचे जोडून समाजातील वंचित व गोरगरीब लोकांसाठी वेळोवेळी धावून जाणारा, उपयोगी पडणारा ग्रुप म्हणून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वीही सुमारे ५०० दिव्यांगांना ई बाईक, भजनी मंडळांना भजनी साहित्य, कामगारांना कीट वाटप करण्यात आलेले असून गुणवंत विद्यार्थी सत्कार, आरोग्यसेवेचेकार्यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती विषद करून अनाथ मुलांना सदैव मदतीचा हात दिला जाईल याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन माजी प्राचार्य प्रा. सचिन पाटील यांनी केले तर आभार “विकी बाबा युवा मंच” चे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सोनवणे, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, राष्ट्रवादीचे नाटेश्वर पाटील, नगरसेवक मनोज चौधरी, विजय महाजन, वासुदेव चौधरी, धीरेंद्र पुर्भे, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, डॉ. कमलाकर पाटील, सचिन पवार, पी.के.पाटील, जितू पाटील,उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, मोहन पाटील, बालाशेठ लाठी, वासुदेव सोनवणे, पिक संरक्षणचे चेअरमन दगडू चौधरी, राजेंद्र पाटील, उगलाल पाटील, शाळेचे चेरमन विक्रम पाटील युवा सेनेचे भैया मराठे, अमोल पाटील, यांच्यासह जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी व सरपंच, जीपिएस मित्र परिवार, विकी बाबा युवा मंच, शिवसेना युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.