दोंडाईचा : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकस् असोसिएशन लि. मुंबईच्या पंचवार्षिक निवडणूक 2022-2027 साठी विश्वास को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर तसेच प्रा.संजय भेंडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेलने’ 21 पैकी 18 जागा जिंकून अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. या पॅनलतर्फे नागरी सहकारी बँक नाशिक विभाग मतदारसंघामधून दि हस्ती को – ऑप. बँकेचे प्रेसिडेंट कैलास जैन यांनी निवडणूक लढवली. या गटातील उमेदवारांना धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व नगर या जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींनी मतदान केले. यात अत्यंत अटीतटीच्या निवडणूक लढतीत हस्ती बँक प्रेसिडेंट कैलास कांतीलाल जैन यांच्यासह देवळा अर्बन बँकेचे राजेंद्र सूर्यवंशी यांनी विजय प्राप्त केला.
या निवडणुकीत विश्वास ठाकूर, अजय ब्रम्हेचा, सतीश मदाने (जळगाव), ज्ञानेश्वर महाजन (रावेर), गिरीष घैसास, अशोक पितळे (नगर) व नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार सहकारी बँक जिल्हा असो.चे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कैलास जैन यांचे मनोज रघुवंशी, किशोर वाणी, प्रकाशचंद जैन, शशी अहिरे, अॅड. अशोक शेळके, राजेन्द्र भोसले, अशोक झंवर, व्यवहारे, सुनील कंगाळे, नरेंद्र कासलीवाल, मनोज दिसा, पंकज मुंदडे, दत्तात्रय पवार, चंद्रहास गुजराथी, अशोक खलाणे, अतुल संघवी, प्रवीण कुडे, देवीदास पाटील यांनी अभिनंदन केले.
सोबतच उद्योजक अशोक जैन, हस्ती बँक बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन किशोर जैन, बँकेचे ज्येष्ठ संचालक पहलाज माखिजा, संजय दुग्गड, विजू पाटील, शकीलभाई व संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सरव्यस्थापक माधव बोधवाणी, सर्व शाखा समिती समिती सदस्य यांची मोलाची साथ लाभली. तसेच सर्व भागधारक, सभासद, खातेदार, ग्राहक सोबतच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी आनंद व्यक्त केला.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकस् असोसिएशन लि. ही महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँका या सहकार क्षेत्रातील बँकांच्या कामकाजात समन्वय साधणारी संस्था आहे. कै. जनार्दन अ. मदान यांच्या बॉम्बे प्रोव्हिन्सिअस बँकिंग इन्क्वायरी कमिटी 1929-30च्या शिफारशीनुसार ऑक्टोबर 1929 मध्ये दि बॉम्बे स्टेट को- ऑप. बँकस् असोसिएशन लि. ह्या नावाने संस्थेची स्थापना झाली. मुंबई राज्याच्या विभाजनानंतर 1 जुलै 1962 पासून ‘दि महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह बँकस् असोसिएशन लि. मुंबई’ असा नावात बदल करण्यात आला. सन 1939 मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आर.जी.सरैय्या व मानद सचिव कै.वैकुंठभाई मेहता होते. यानंतर प्रा.डी.जी.कर्वे, कै.प्रा.धनंजयराव गाडगीळ, कै.वसंतदादा पाटील तसेच कै. विष्णू आण्णा पाटील, अजित पवार या व्यक्तींनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. तर या संस्थेचा मानद सचिव पदाचा भार हा कै. व्ही.पी.वर्दे, कै.सी.डी.दाते, कै.व्ही.एम.जोगळेकर, कै. डॉ.वा.चु. श्रीश्रीमाळ, डॉ.डी.बी.कदम, डी.एल.क्रियाडो यासारख्या बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी वाहिला आहे.
सहकारी बँकांना त्यांची धोरणे, कार्यपद्धती ह्याबाबत मार्गदर्शन करणारी एक मध्यवर्ती समन्वयक संस्था असोसिएशनच्या रूपाने कार्य करू लागली. सहकार खाते, अर्थमंत्रालय, रिझर्व बँक आणि सहकारी बँका यामधील दुवा साधण्याचे काम असोसिएशन करते. सहकार क्षेत्रातील भविष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान या चतु:सूत्रीचा अवलंब असोसिएशन करत असते.
दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकस् असोसिएशन लि. मुंबईच्या निवडणुकीतील यश माझे नसून हस्ती बँकेमधील गेल्या 51 वर्षात ज्यांनी या बँकेची पाया भरणी केली, ते संस्थापक स्व.हस्तीमलजी जैन व त्यांचे संस्थापक सहकारी, हस्ती बँकेचे आधारस्तंभ स्व.पप्पाजी शांतीलालजी जैन व बँकेचे 25 वर्ष अध्यक्ष व बँकेत नवनवीन कल्पना राबविणारे बँकेच्या प्रगतीचे शिल्पकार स्व.काकाजी कांतीलाल जैन व त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ, बँकेचे माजी अध्यक्ष मदन जैन, अशोक जैन, किशोर जैन, बँकेचे माजी अध्यक्ष पहलाज माखेजा व आताचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे सीईओ कुचेरिया, बोधवाणी, मराठे, सतीष जैन, सुनील गर्गे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या तपश्चर्येची फलश्रुती आहे.
– कैलास जैन