जळगाव : महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत होमगार्ड आस्थापनेवरील राज्यात ३४ जिल्ह्यातील एकूण ९,७०० जागांसाठी भरती प्रक्रिया १६ ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे. यासाठीच्या पत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत.
होमगार्ड जवान या पदासाठी २० ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतील. शारीरिक विकलांग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमदेवार या नोकरीसाठी अर्ज शकत नाही. होमगार्ड जवान पदासाठी शारिरीक मैदानी चाचणी होईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल. ज्या जिल्ह्यातील उमेदवार रहिवासी असेल त्याला त्याच जिल्ह्यात संधी प्राप्त होणार आहे. आयटीआय जिल्हास्तरीय क्रीडा, माजी सैनिक, एनसीसी, नागरी संरक्षण सेवेत किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र, जड वाहन परवाना आदी तांत्रिक अर्हता पूर्ण केल्यास दहा गुण मिळणार आहे. शासनाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना नोंदणी करता येईल.