भारतीय संस्कृतीशी जोडलेले स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी महाकुंभला देणार भेट

#image_title

नवी दिल्ली : महाकुंभ म्हणजे हिंदू धर्माच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा महामेळावा. कोट्यावधी भाविक या सोहळ्यामध्ये सामील होतात. सामान्य माणसांपासून ते अनेक दिग्गज मंडाळी या महामेळाव्यात देश विदेशातून सामील होत असतात. अशातच आता माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार ॲपल कंपनीचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल या देखील उपस्थित राहणार आहे. जगातील अत्यंत प्रभावशाली असलेल्या माणसांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे. या संदर्भात महामंडलेश्वर स्वामी कैलाशनंदजी महाराज यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

६१ वर्षीय लॉरेन पॉवेल या १३ जानेवारी रोजी प्रयागराज येथे येणार आहेत. निरंजन आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशनंद यांच्या शिबिरात त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. २९ जानेवारी पर्यंत लॉरेन भारतात राहणार आहेत. या भेटी दरम्यान सनातन धर्म समजून घेण्याचा प्रयत्न त्या करणार आहेत. १९ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या कथेचे यजमानपद त्या भूषवणार आहेत. आयफोनचे निर्माते स्टीव्ह जॉब्स यांचा सनातन हिंदू परंपरेवर विश्वास होता. या संदर्भात त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. स्टीव्ह जॉब्स अनेक साधू संतांवर त्यांची श्रद्धा होती. आपल्या जीवनातील सत्य शोधण्यासाठी ते १९७४ साली भारतात आले. यावेळेस ते नीम करोली बाबा यांच्या दरबारात आले होते. परमहंस योगानंद यांनी लिहीलेलं ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी’ हे पुस्तक त्यांना विशेष आवडायचे.