Stock Market Closing : जागतिक सकारात्मक संकेत आणि भारताची अपेक्षेपेक्षा चांगली जीडीपी वाढ आदींमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी कायम राहिली आहे. बँकिंग, ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रातील समभागांच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 71 अंकांच्या किंचित वाढीसह 73,879 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 20 अंकांच्या उसळीसह 22,400 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात बँकिंग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फार्मा, ऊर्जा, इन्फ्रा, कमोडिटीज आणि तेल आणि वायू क्षेत्रातील समभाग वाढीसह बंद झाले तर ग्राहक टिकाऊ वस्तू, एफएमसीजी, धातू, मीडिया, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील समभाग नुकसानासह बंद झाले.
शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. आजच्या व्यवहारात, बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 393.68 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 392.23 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात मार्केट कॅपमध्ये 1.45 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.