शेअर बाजार : आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत निराशाजनक ठरले आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 617 अंकांनी घसरणीसह 73,502 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 161 अंकांनी घसरून 22,332 अंकांवर बंद झाला. बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने घसरण दिसून आली.
बाजार मूल्यात घट
बाजारातील घसरणीमुळे बाजार भांडवलात घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे बाजार मूल्य 389.60 लाख कोटी रुपयांवर आले आहे जे मागील सत्रात 392.75 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 3.15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.