Stock Market : भारतीय बाजारात गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी, मार्केट कँपमध्येही लक्षणीय वाढ

Stock Market Closing : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक दारांसाठी आज (21 मार्च ) फायदेशीर ठरला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांच्या 2024 मध्ये तीन वेळा व्याजदर कपात करण्याच्या विधानामुळे जगभरातील शेअर बाजारांचा उत्साह वाढला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 539 अंकांच्या उसळीसह 72,641 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 172 अंकांच्या उसळीसह 22012 वर बंद झाला.

भारतीय शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप वाढून 380 लाख कोटी रुपये झाले आहे जे गेल्या सत्रात 374.12 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.88 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.