शेअर बाजार : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रातही भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. बँकिंग, ऑटो आणि एनर्जी समभागात झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 453 अंकांनी घसरून 72,643 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 123 अंकांनी घसरून 22,023 अंकांवर बंद झाला.
बाजार मूल्यात घट
शेअर बाजारातील विक्रीमुळे बाजार भांडवलात घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप घसरून 378.35 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे जे गेल्या सत्रात 380.11 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे 1.76 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.