शेअर बाजार : आठवड्यातील दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 72600 च्या पुढे व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 22100 च्या जवळ चांगल्या वाढीसह व्यवहार करत आहे. मेटल, बँकिंग आणि रियल्टीसह ऑटो क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे. तर एफएमसीजी क्षेत्रात विक्री होत आहे.निफ्टी आयटी, निफ्टी बँक निर्देशांकांत वाढ झाली, तर निफ्टी फार्मा निर्देशांक आणि एफएमसीजी निर्देशांकात सुरुवातीला विक्रीचा दबाव होता.