Stock market : मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात २ दिवसांच्या घसरणीनंतर, बाजार वाढीसह बंद झाले. दिवसभर चांगली वाढ दाखवल्यानंतर, निफ्टी ३७८ अंकांच्या वाढीसह २३,७३९ वर बंद झाला. सेन्सेक्स १३९७ अंकांनी वाढून ७८,५८३ वर बंद झाला. बँक निफ्टी ९४७ अंकांच्या वाढीसह ५०,१५७ वर बंद झाला. निफ्टी मिडकॅप ८०० अंकांच्या वाढीसह ५३,७८५ पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी स्मॉलकॅप १७८ अंकांच्या वाढीसह १६,७९६ वर बंद झाला.
कोणते शेअर्स वधारले ?
निफ्टी इन्फ्रा, पीएसयू बँक, एनर्जी, फायनान्स आणि मेटल निर्देशांकाने बाजारातील तेजीत सर्वाधिक वाढ नोंदवली. श्रीराम फायनान्स +५.५%, एल अँड टी ४.५%, बीईएल +४% आणि अदानी पोर्ट्स +४% निफ्टीवर टॉप गेनर होते. कल्याण ज्वेलर्स +१५%, एजियन्स लॉजिस्टिक्स +१२.५%, नुवामा वेल्थ +११% आणि एबीबी इंडिया +८% बीएसई वर वधारले.
कोणते शेअर्स घसरले ?
ट्रेंट -६%, ब्रिटानिया -२%, हिरो मोटोकॉर्प -१%, नेस्टल -१% त्रिवेणी टर्बाइन -१०%, अजंता फार्मा -६%, ट्रेंट लिमिटेड -६% आणि एमामी लिमिटेड -५% घसरले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरील टॅरिफ वाढ लागू करण्याची प्रक्रिया एक महिन्यासाठी पुढे ढकलल्यानंतर आशियाई बाजारपेठांमध्ये सुधारणा झाल्यामुळे देशांतर्गत बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले.
ट्रम्प यांनी टॅरिफ प्लॅन पुढे ढकलला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मेक्सिको, कॅनडा आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर कठोर टॅरिफ लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यांनी दावा केला की हे टॅरिफ “अमेरिकन लोकांच्या सुरक्षिततेसाठी” आवश्यक आहेत. तथापि, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि मेक्सिकन अध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्याशी स्वतंत्र चर्चेत, ट्रम्प यांनी दोन्ही देशांवरील टॅरिफची अंमलबजावणी किमान एक महिन्यासाठी थांबवण्यास सहमती दर्शविली.