Stock Market: बुधवारी दि. २९ जानेवारी रोजी देशांतर्गत शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही मोठी खरेदी दिसून आली. आजच्या व्यवहारांती निफ्टी २०५ अंकांनी वाढून २३,१६३ वर बंद झाला. सेन्सेक्स ६३१ अंकांनी वाढून ७६,५३२ वर आणि बँक निफ्टी २९९ अंकांनी वाढून ४९,१६५ वर बंद झाला.
कोणते शेअर्स वधारले ?
श्रीराम फायनान्स ४.५%, बेल +३.३५%, विप्रो +२.९% आणि इन्फोसिस +२.९% हे शेअर्स आज सर्वाधिक वधारले होते. तर त्याचवेळी मारुती सुझुकी -१.२%, भारती एअरटेल -१%, एशियन पेंट्स -१% आणि टाटा कंझ्युमर -०.५% घसरणीसह बंद झाले.
आजच्या वाढीची कारणे
१ )आयटी, बँक आणि टू-व्हीलर कंपन्यांच्या निकालांमुळे पाठिंबा मिळाला
२ ) मुदत संपण्यापूर्वी फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये शॉर्ट कव्हरिंग
३) पॅनिक सेलिंगनंतर मिड-स्मॉलकॅप शेअर्सची विक्री जास्त झाली
४ ) एफआयआयकडून विक्रीचा दबाव कमी
५ ) दोन दिवसांपासून देशांतर्गत निधीकडून जोरदार खरेदी
६ ) अमेरिकेतून चांगले संकेत