शेअर बाजार : आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 305 अंकांच्या उसळीसह 73,000 च्या वर 73,095 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 72 अंकांच्या उसळीसह 22,193 अंकांवर बंद झाला. सकाळच्या वेळी लाल रंगात उघडल्यानंतर, खालच्या स्तरावरील खरेदीमुळे बाजार मोठ्या गतीने परतला. बाजारातील ही वाढ ऑटो आणि आयटी समभागांच्या नेतृत्वाखाली परतली आहे.
आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, मेटल, रिअल इस्टेट, कंझ्युमर ड्युरेबल्स, इन्फ्रा हेल्थकेअर, बँकिंग क्षेत्रातील समभागात खरेदी दिसून आली. तर तेल आणि वायू, ऊर्जा आणि मीडिया क्षेत्रातील समभागांमध्ये घसरण झाली आहे. आजच्या व्यवहारात मिडकॅप समभागांमध्ये झालेल्या विक्रीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक घसरला, तर स्मॉलकॅप समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे स्मॉलकॅप निर्देशांक घसरला. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 29 समभाग वाढीसह आणि 21 समभाग घसरणीसह बंद झाले.
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 391.97 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 392.05 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे 8000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.