---Advertisement---

Stock Market Closing: शेअर बाजार लाला रंगात बंद, सेन्सेक्स 379 अंकांनी घसरला

by team
---Advertisement---

Stock Market Closing  : आजच्या व्यवहारांती म्हणजेच ९ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार तोट्यासह बंद झाला. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स ३७९.९३ अंकांनी घसरून ७३,८४७.१५ वर बंद झाला आणि निफ्टी १३६.७० अंकांनी घसरून २२,३९९.१५ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक १ टक्क्यांनी घसरला. ऑटो (०.३ टक्क्यांनी वाढ) आणि एफएमसीजी (१.५ टक्क्यांनी वाढ) वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.

आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पॉलिसी रेपो रेट 6.0% पर्यंत कमी करण्याची घोषणा केली. आपल्या शेवटच्या बैठकीत (7 फेब्रुवारी), RBI ने रेपो दर 25 बेस पॉईंटने कमी करून 6.25% केला होता. तसेच यूएस टॅरिफमुळे आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कमी होण्याची अपेक्षा वाढली होती.

भारतीय शेअर बाजारातून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) विक्री सुरूच आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी 4,994.24 कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स विकले आहेत. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) 3,097.24 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

बीएसई वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 9 एप्रिल रोजी 393.96 लाख कोटी रुपयांवर खाली आले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवार, 8 एप्रिल रोजी 396.57 लाख कोटी रुपये होते.

कोणते शेअर घसरले ?

विप्रो, एसबीआय, टेक महिंद्रा,स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), टाटा स्टील आणि सन फार्मा हे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणते शेअर्स वधारले ?

एचयूएल, टाटा कंझ्युमर, टायटन कंपनी आणि पॉवर ग्रिड कॉर्प आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स वाढीसह बंद झाले. हे आज सर्वाधिक वाढणाऱ्यांमध्ये होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment