Stock market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजी कायम, निफ्टी 23200 च्या वर

Stock market : गुरुवार ( दि. ३ ० ) रोजी देशांतर्गत शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला आहे. आजच्या व्यवहारांती निफ्टी ८६ .४०  अंकाच्या वाढीसह २३,२४९ च्या जवळ बंद झाला. निफ्टी बँकही १४६ अंकांच्या वाढीसह ४९,३११ वर तर BSE चा सेन्सेक्स २२६ अंकांच्या उसळीसह  ७६,७५९ च्या पातळीवर थांबला.

आजच्या व्यवहारात टाटा मोटर्स, विप्रो, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, श्रीराम फायनान्स या समभागांत  सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. तर याचवेळी  बजाज फायनान्स,बजाज फिनसर्व्ह, हिंडाल्को, इंडसइंड बँक, एनटीपीसी हे सर्वाधिक वाढणारे शेअर होते. त्यासोबतच आज पीएसयू समभागांमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली आहे.

जागतिक बाजार अपडेट
यूएस फेडने अपेक्षेनुसार कोणताही बदल न करता व्याजदर स्थिर ठेवले. फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल म्हणाले – जर महागाई अजूनही लक्ष्यापेक्षा जास्त असेल, तर दर कमी करण्याची घाई नाही. फेड धोरणानंतर, अमेरिकन बाजार घसरणीवर बंद झाले. डाओ सुमारे १५० अंकांनी कमकुवत झाला, तर नॅस्डॅक १५० अंकांनी सुधारल्यानंतर १०० अंकांनी खाली बंद झाला. गिफ्ट निफ्टी २३१५० च्या खाली स्थिर होता. डाऊ फ्युचर्स १०० अंकांनी वाढले होते तर निक्केई मंदावला होता. चीन, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील बाजार आजही बंद आहेत.

आज बाजारासाठी महत्त्वाचे मुद्दे
दर कपात करण्याची घाई नाही: फेड
डाओ १३६ अंकांनी घसरला, नॅस्डॅक १०१ अंकांनी घसरला
देशांतर्गत बाजारात सोने नवीन उच्चांकावर