Stock Market : आठवड्यतील शेवटच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे जागतिक बाजारातून कमजोर संकेत मिळाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात हि घसरण पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये 250 हून अधिक अंकांची घसरण दिसून आली. आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 29 शेअर्स लाल रंगात व्यवहार करताना पाहायला मिळत आहे.