Stock Market Opening : घसरणीसह भारतीय शेअर बाजाराची सुरवात

शेअर बाजार : आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली असून सेन्सेक्स 72500 च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली गेला आहे. आज बाजारात बीएसईचा सेन्सेक्स 285.48 अंकांच्या घसरणीसह 72,462 च्या स्तरावर आणि NSEचा निफ्टी 109.25 अंकांच्या किंवाघसरणीसह 21,946 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टी 52.40 अंकांनी घसरल्यानंतर 46,523 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

मेटल शेअर्स आणि पीएसयू बँका वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत आहेत. NSE च्या निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी फक्त 11 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत आणि 39 शेअर्समध्ये घसरण होत आहे. निफ्टीच्या टॉप गेनर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस 1.28 टक्क्यांच्या वाढीसह आणि यूपीएल 0.68 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत. बजाज ऑटो 0.54 टक्के, बजाज फायनान्स 0.42 टक्के आणि हिंदाल्को 0.32 टक्क्यांनी वाढले आहेत.